logo1
Seva marg
क्लिक करा
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, कृषीशास्त्र विभाग

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ व अध्यात्मिक विकास केंद्र मार्ग दिंडोरी आज देश-विदेशात कार्यरत आहे. सेवा मार्गाच्या माध्यमातून गेल्या ५० वर्षात हजारो लाखो कुटुंबीय ज्यांची वाताहत झालेली दिशाहीन होऊन वैफल्यग्रस्त झालेली आज प.पू गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने आणि सेवेच्या माध्यमातुन सन्मार्गाला लागलेली आहेत आणि हाच वासा आणि व्रत हाती घेऊन प.पू गुरुमाऊलीचे स्वप्नपुर्ततेसाठी ग्रामविकासाच्या माध्यमातुन सेवा मार्गात मानवी जीवनशी निगडीत १७ विभागाअंतर्गत कार्य अविरत चालु आहे आणि त्यातील एक प्रमुख कृषीशास्त्र विभागाच्या माध्यमातून प.पू गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने कृषीशास्त्र विभागाची भावी वाटचाल सुरु आहे. अधिक माहिती


क्लिक करा
दिंडोरी प्रणीत कृषी डेमो मॉडेल

दिंडोरी प्रणीत कृषी डेमो मॉडेल हे एक असे आदर्श आध्यात्मिक आणि विज्ञानाची सांगड घालून तयार केलेले मॉडेल असून त्याची प्रत्यक्षात उभारणी करून सर्व सामान्यातल्या-सामान्य शेतकरी वर्गाला त्याचा अभ्यास करण्यासाठी उभारलेला आहे. प्राचीन भारतातील शेती हि निसर्गाच्या अनुसरून करत व त्याचा विसर होऊ नये म्हणून दिंडोरी प्रणीत शेती डेमो मॉडेल अतिशय उपयुक्त ठरत आहे.याठिकाणी वास्तूशास्त्रानुसार गोठ्याची संरचना तसेच शेताची रचना केलेली असून अधिक माहिती

samarth sevekari mandiyali
क्लिक करा
समर्थ कृषी मांदियाळी

या भागातील हजारो गरजू व होतकरू शेतकऱ्यांना सेंद्रिय तसेच अल्प खर्चातील शेती, गौ-संगोपन, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी जोडव्यवसाय व स्वयंरोजगार, यांसारख्या अनेक विषयांवर जिल्हा व गाव निहाय मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन या शेतकऱ्यांना सावरण्याचे प्रयत्न प.पू.गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शेतकरी सेवेकऱ्यांकडून केले जात आहे. अधिक माहिती

pashu govansh dindori
क्लिक करा
पशु-गौवंश विभाग

हिंदू धर्मात गायीचे महत्व सर्वज्ञात आहे. पशु गौवंश विभाग हा एक कृषीचाच अविभाज्य घटक असल्याने हा विभाग आजही गायीचे संगोपन करून त्यात संशोधन करत आहे. हा विभाग गायीचे पालन-पोषण शास्त्रोक्त पद्धतिने करून औषधनिर्मितीसाठी गोमुत्राचा पुरवठा करतो. अधिक माहिती

थोडक्यात महत्वाचे..
logo1

     तेजोनिधी सद गुरु प.पू. मोरेदादा यांनी दिंडोरी येथे शेतीला आध्यात्मिक व विज्ञानाची सांगड घालून एक शास्रोक्त पद्धतिने शेती कशी करावी याचे सखोल मार्गदर्शन सर्व समाजातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक माहिती

वृत्त विशेष