निसर्गातील बदल सहन करणे व आघातांचा सामना करणे हि ताकद निसर्गाने सर्व वनस्पतींना दिली आहे. रासायनिक खते व औषधींना आपण ती कमी केली आहे.  मेलेले जनावर खाण्यासाठी कैक मैलाहून गिधाडे येतात कुठून निसर्गाने केलेली हि व्यवस्था आहे. किटक आल्यावर परभक्षी किटक येणार व कीटकांना खाणार.सृष्टीमध्ये १ टक्के कीटक शाकाहारी आहेत. जे पान, फुल, फळ खातात ज्यांचा आपल्याला त्रास होतो. ९९ टक्के कीटक हे मांसाहारी आहेत. त्यांचा आपल्याला काहीही त्रास नाही. १ टक्केला मारण्यासाठी आपण कीटकनाशक फवारतो. त्यावेळेस निरुपद्रवी असलेले १ टक्के कीटकांचे आयुष्य अल्प; मात्र पुनर्उत्पादन प्रचंड ! उदा. माशीचे आयुष्य ३ दिवस ते ३ आठवडे. या काळात कोट्यावधी अंडी देतात. कीटकनाशक मारल्यानंतर दोन्हीही मरतात. मात्र मरण्याआधी १ टक्के शाकाहारी अल्पायुषी कीटकांनी पानाच्या विरुध्द बाजूला हजारो अंडी घातलेली असतात व पुनर्उत्पादन चालू राहते. 
         सूक्ष्म पर्यावरण (Micro Climate)
         शेतात सूक्ष्म पर्यावरण निर्माण करण्यासाठी अनेक वनस्पतींचा उपयोग होतो. पूर्वी शेताच्या बांधावर अनेक वनस्पती वाढलेल्या असायच्या. त्यामुळे निसर्गतः पर्यावरण सांभाळले जायचे. आता आपण सर्वांनी बांध स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे जमिनीची धूप आणि पिक किडीला बळी पडणे, असे दुहेरी नुकसान होते. ते कसे ? तर वाहून जाणारे पाणी हे बांधावरील झाडे थांबवायची व जमिनीत पाणी शोषले जायचे. बांधावरील झाडावर अनेक मित्र कीटकांचा वावर असायचा. ते पिकावर आलेली किडी खाऊन आपला चरितार्थ चालवतात  तसेच गरम हवेचे झोत, प्रचंड वेगाने वाहणारे वारे, वातावरणातील आर्द्रता या सर्व गोष्टी बांधावरील झाडामुळे नियंत्रित होत असते. यासाठी आता आपण काही वृक्ष व झुडपे आपल्या बांधावर लावावेत. शेताच्या बांधाला कडूलिंब, पांगारा, कडीपत्ता, सीताफळ, गीरीपुष्प, शेवरी, पारशी एरंड, बकाना, रुई, सब्जा, अडुळसा हे पश्चिम व दक्षिण बाजूस लावावेत. अशोक, सुरु, सिल्वर ओक यांची वारापडसाठी लागवड करावी. पिकांमध्ये पुढील पिकांची लागवड करावी.
                        
                   तुळस  :-  ओझोन वायूची निर्मिती करते व पंढरी माशी मंजुलावर बसल्यास नपुंसक होते व डास थांबत नाहीत.
                   झेंडू  : -  झेंडूच्या मुळांमुळे सूत्र कृमिला प्रतिबंध होतो. लेडीबर्डबिटल नावाचा भुंगेरा जो मावा व मिलीबगला खातो तो देखील यावर वाढतो.   
                   कडूलिंब  :-  २५० प्रकारच्या व्हायरसला अटकाव, वातावरणात शुद्धी व मित्र कीटकांना आश्रय.
                   कडीपत्ता  :-  – बुलबुलसारखा पक्षी यावर खोपे बनवतो जो अनेक किडीला खातो.
                   एक जमिनीत सतत एकाच प्रकारचे पिक घेत राहिल्यास त्या पिकाभोवतीच्या वातावरणात जमिनीत व पिकावर जी कीड किंवा रोग वाढतात, त्यांची साखळी तयार होते व हे चक्र तोडणे अवघड जाते. एकदालावर एकदल सतत घेतल्यास जमिनीतील नत्राचे प्रमाण स्थिर राहत नाही. एकदालावर द्विदल घेतल्यास जमिनीत नत्राचे प्रमाण स्थिर करता येते.
         सापळा पिक पद्धत 
         भाजी पाल्यात मुळा, अंबाडी, मोहरी, ज्वारी लावल्यास कीड प्राधान्याने या पिकावर येते. पर्यायाने मुख्य पिक सुरक्षित राहते.
टीप: - एकाच वर्षी एकदालावर एकदल किंवा द्विदलावर द्विदल पिक घेऊ नये. याऐवजी एकदालावर द्विदल व द्विदालावर एकदल असे फेरपालट करावा.
 सापळा पिकांची निवड करणे (सहजीवी पिकांची निवड करणे) 
 
 
| अ.क्र. | पिकाचे नाव | सहजिवी पीक | उपयोग | 
|---|
|
| १) | प्रत्येक पिकात तृणधान्य, गळीत धान्य | चावळी भाजीपाला | हवेतील नत्र शोषून सह्जीवी पद्धतीने आपल्या (स्थानिक) मुलाच्यागाठीमध्ये साठवून मुख्य पिकास पुरवठा करते व मुख्य पिकावर येणारा माव्याचा प्रादुर्भाव कमी करेल. | 
| २) | टोमॅटो | झेंडू | टोमॅटोत झेंडूची लागवड केल्यास टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अलीचा पतंग झेंडूच्या फुलावरील आपली अंडी घालतांना व फुले तोडून नियंत्रण करता येते व सूत्रकृमिचा प्रादुर्भाव मुख्य पिकावर होत नाही. | 
| ३) | सर्व भाजीपाला | मका | भाजीपाला पिकामध्ये मधूनमधून मका लावल्यास मका पिकावर क्रायसोपा फळे पोखरण्याऱ्या अलीची अंडी खातात. | 
| ४) | कोबी, फ्लॉवर | मोहरी | कोबी व फ्लॉवरच्या वाफ्याच्या वाफ्यावर मोहरी लावणे. | 
| ५) | शेताच्या बांध्यावर | पारसी एरंड | बांध्यावर पारसी एरंडाची लागवड केल्याने सुप्त अवस्थेतील फळ पोखरणारी अळी आपला जीवनक्रम काही काळ या झाडावर पूर्ण करते. त्यावेळेस या अळीचे नियंत्रण करता येते. | 
 
    मित्र कीटक वाढ करणे :  
 "जीवो: जीवस्य: जीवनम्"   हे निसर्गाचे तत्व आहे. एक जीव हा दुसऱ्या जीवाला खाऊन आपली उपजीविका करतो. सर्व सजीव सृष्टीत समतोल राखण्यासाठी निसर्गाने अनेक अन्न साखळी बनविल्या आहेत (उदा. उंदीर – साप –गरुड ) या लक्षात न घेता रासायनिक खतांचा व किटक नाशके, बुरशी नाशकांचा वापर केल्यामुळे ही नैसर्गिक अन्न साखळी कोलमडून पडते व किडींचा प्रादुर्भाव वाढतो 
या  सर्व रासायनिक फवारण्या बंद केल्याने निसर्गाची व्यवस्था उत्तम काम करते व मित्र किडीची संख्या वाढते व या मित्र किडी हानिकारक किडीचा फडशा पाडतात.
  नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी दुर्मिळ वनौषधी व उपाय 
  
 दशपर्णांक 
        दशपर्णी अर्क बनविण्यासाठी वनस्पती निवडताना जनावरे ज्याला तोंड लावत (खात) नाहीत. ज्याला उग्र वास किंवा चव आहे. ज्याचा रस / चीक जहाल आहे-    विशेषत: दुधाळ चिकाच्या वनस्पती निवडाव्यात .
     
     
        १) कडूलिंबाचापाला ५ किलो   
  		
        २) सीताफळपाला २ किलो     
      	
		३) निरगुडी पाला २ किलो   	    
 
        ४) कण्हेर पाला २ किलो         
     
		५) रुई २ किलो				 
         
        ६) पपईपाला २ किलो      
        
		७) एरंडपाला २ किलो	 
 	       
		८) करंजपाला २ किलो	 
   
		९) गुळवेलपाला २ किलो	    
 	     
		१०) धोतरयाची पाला २ किलो	 
   
        ११) गोमुत्र ५ ते १० किलो 
 
        १२) हिरवी मिरची २ किलो 
 
        १३) ताजे शेण २ किलो	 
 
        १४) २०० लि पाणी   
 
     
      हे सर्व २०० लिटर पाण्यात ३० ते ४० दिवस सडवणे. ड्रमचे  तोंड कापडाने बांधून ठेवणे. हे स्टॉक सोल्युशन मधून २ ते ५ लिटर अर्क तीव्रता बघून २०० लिटर पाण्यात फवारणीसाठी वापरावे. हे बुरशीनाशक व कीटकनाशक म्हणून काम करते.  
    तंबाखू अर्क
    एक किलो तंबाखू 5 लिटर पाण्यात 7 दिवस भिजत ठेवा फडक्याने गाळून अर्क काढून घ्या, 15 लिटर पाण्यात 125 मिली तंबाखु अर्क टाकून फवारणी करा. शेगां, कणिस, फळ यांचे पोषण / वाढीच्या अवस्थेत या द्वारे पोट्याशिअम प्राप्त होवून दाणे भारण्यास फळ फुगवणीस उपयोगा होतो. ( मात्र परदेशात निर्यात होण्यासाठी तंबाखू अर्क फवारणी निशिद्ध असल्यास यांचा वापर करु नये.)
    दशपर्णी अर्क बनवितांना खालील गोष्टींची काळजी घ्यावी
    १) ज्याच्यात आपण दशपर्णी अर्क बनविणार आहोत ते साधन स्वच्छ धुुवून घ्यावे व थोडेसे गोमुत्र टाकून निर्जंतुक करावे.
 	२) पाणी ताजे व स्वच्छ घ्यावे.
 	३) शेण ताजे घ्यावे.
 	४) इतर निविष्ठाचा लगदा करण्यापूर्वी पा०याने स्वच्छ कराव्यात, निविष्ठांचा लगदा केल्यानंतर त्यांच्यावर माशा बसणार नाही ,    
 	    याकडे लक्ष दयावे.
 	५) झाडांची पाने तोडल्यानंतर पाण्याने स्वच्छ करूनच लगदा करावा.
 	६) अर्क हलविण्यासाठी जे साधन वापरणार आहात ते काम झाल्यानंतर झाकून ठेवावे. 
 या सर्वांची काळजी घेण्याचे कारण असे की , झाडांच्या पानांवर व इतर निविष्ठांवर माशा व इतर किटक त्यांची अंडी घालतात   
आणि आपण ते जसेच्या तसे अर्कात टाकल्यामुळे त्यातील काही अंडी कालांतराने फुटतात व त्यांचा पहिला जिवनक्रम अळी  असल्याने ती दशपर्णी अर्कात आपल्याला दिसतात,-यासाठी कोणतेही किटक व त्यांची अंडी दशपर्णी अर्कात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 या सर्वांची काळजी घेण्याचे कारण असे की , झाडांच्या पानांवर व इतर निविष्ठांवर माशा व इतर किटक त्यांची अंडी घालतात   
आणि आपण ते जसेच्या तसे अर्कात टाकल्यामुळे त्यातील काही अंडी कालांतराने फुटतात व त्यांचा पहिला जिवनक्रम अळी  असल्याने ती दशपर्णी अर्कात आपल्याला दिसतात,-यासाठी कोणतेही किटक व त्यांची अंडी दशपर्णी अर्कात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
    मिलीबग 
                 
                    -   वाळवलेल्या बाभूळ शेंगा बियांसह कुटून व वस्त्रगाळ भुकटी करून ठेवणे. २०० लिटर पाण्यासाठी १० ग्रॅम म्हणजे १ तोळा वापरणे.
-  टाकाऊ फळांपासून बनविलेले एंझाईम १.५ते२ लिटर २०० लिटर पाण्यातून फवारणी करावी 
भुरी रोग 
   - 	पपई पाला २ किलो १० लिटर गरम पाण्यात मिसळून २ दिवस सडवून गाळून फवारणी करा.
-  गुळवेलाचा पाला २ किलो, गोमुत्र ३ लिटर, २०० लिटर पाण्यात फवारणी करा.
-  गुळवेल २ किलो, गोमुत्र ३ लिटर, २०० लिटर पाण्यात २ दिवस सडवून गाळून फवारणी करा.
-  २०० ग्रॅम वावडिंग पूड, गोमुत्र ३ लिटर, २०० लिटर पाण्यात २ दिवस सडवून गाळून फवारणी करा.
-  वेखंड चूर्ण २०० ग्रॅम, गोमुत्र ३ लिटर, २०० लिटर पाण्यात २ दिवस सडवून गाळून फवारणी करा.
हुमणी किंवा उधई जमिनीत असल्यास :पहिला पाऊस पडला म्हणजे हुमणीचे पतंग शेणखतात अंडी घालतात मग अळया आधी शेणखत खातात जमिनीत असल्यास आधी पिकांचे काष्ठ अवशेष खातात ते उपलब्ध न झाल्यास पिकाच्या मुळया खातात.	 
  
  -   वेखंड १ किलो ६ लिटर पाण्यात उकळून ३ लिटर करणे. + ५०० ग्रॅम हिंग २०० लिटर पाण्यात टाकून हे पाणी शेतात शिंपडणे. ओले असतांना  झाडच्या बुडाशी टाकणे.
- 	रुई/रुचकिण हिरव्या फांदया पानासह 6 किलो 10 ते 20लिटर पाण्यात निम्मे होईस्तोवर उकळा 200 लिटर पाण्यात  टाकुन ड्रिचिंग करा ठिबक मधुन द्या. 
- 	तंबाखू डस्ट (पावडर) जमिनीतून पिकाच्या बुडावर ५० ग्रॅम देणे किंवा अर्क काढून पाणी ओतणे. 
-   निवडुंग (साबर) ठेचून बुडावर टाकणे.  
कांद्यावरील थ्रीप्स :
	निरगुडीचा कोवळा पाला २ कि. ग्रॅ. पाण्यात उकळा निम्मे अटवल्या नंतर २५ लि. पाण्यात द्रावण करून फवारणी करावी.
 
बुरशी नाशक
 	करपा –बाभळीचा कोवळा पाला ३ कि. ग्रॅम २ लि.पाण्यात उकळा. निम्मे अटवल्यानंतर २०० लि.पाण्यात फवारा.
	
डाउनी – पपईचा रस २ कि.ग्रॅ. + शेवगा पाला २ कि. ग्रॅ. + ४ लि. गोमूत्रात रात्रभर भिजवा. गाळून २०० लि.पाण्यात द्रावण करून फवारणे.
 
डाउनी मिल्ड्यू (फुल किडीसाठी)
निरगुडीचा कोवळा पाला १ किलो, २ लिटर पाण्यात निम्मे होईपर्यंत आटवा. थंड झाल्यावर २५ लिटर पाण्यात फवारणी करावी.
डाळींबावरील फुल किडी
	५ किलो कडीलिंबाचा पाला, २ किलो सीताफळाचा पाला, २ किलो बेशरम पाला, ५ लिटर पाण्यात देशी गाईचे गोमुत्र. २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बुरशीनाशक कडूनिंब अर्क 
	१०० लिटर पाणी, २.५ किलो कडुलिंबाचा पाला, ५ लिटर गोमुत्र, २ किलो देशी गाईचे शेण वरील मिश्रण २ दिवस आंबविणे. दिवसातून ३ वेळा ढवळणे, गाळून फवारणी करणे.
मिरची वरील चुरडा मुरडा :	
  
     -  मिरची लागवड करीत असताना योग्य सहजीवन निवडने उदा. चवळी, मका, झेंडू, तसेच द्विदल पिके व एकदल यांचे योग्य नियोजन करने.
-  आंबट ताक ३ लि व जीवामृत १० लि. १०० ली पाण्यात मिसळून फवारावे. सतत ८ दिवसानी फवारण्या घ्याव्यात.
-  दशपर्णी अर्क ६ लि. + १ लि. गोमूत्र एकत्र करुण १०० ली. पाण्यात फवारणि करावी. वरील दोन्ही फवारण्या आलटून पालटुन ४ दिवसाच्या अंतराने कराव्यात.
-  ३ किलो कांद्याचा लगदा करुण १०० लि पाण्यात चांगले ढवळून याची गाळून फवारणि घ्यावी.
टाकाऊ फळांपासून एन्झाईम: 
 
 	  - १००लिटर पाणी+१०किलो काळा गुळ+३०किलो फळे व भाजीपाला व फळे बारीक करुन गुळाचे द्रावन तयार करुन सर्व एका ड्रम मध्ये टाकुन१०० लिटर पाणी टाका झाकण लावुन सावलीत ठेवा दर ५ दिवसांनी ढवळावे. ९० दिवसांनी हे तयार होते  चोथा शेतात टाकावा व गाळुन वापर करावा यात (लसुण मिरच्या कडुलिंबपाला-लिंबोळया विविध वनस्पति गव्हांकुर) सर्वप्रकारची फळे भाज्या जे उपलब्ध असेल ते वापरु शकता.एन्झाईम वापर :
- फवारणी साठी १५ लि पाणी व ६० ते९० मीली एन्झाईम. 
- ड्रिचींग साठी ८ लि एन्झाईम व २०० लि पाणी . 
फळ झाडाच्या खोडास पेस्ट लावणेसाठी
- 	१०० लिटर पाण्यात २० किलो गाईचे शेण, १० किलो लिंबाचा पाला, ५ लिटर गोमुत्र, २ दिवस सडवा व घोटून खोडास लावा.पिवळा सापळा :
- 	पिवळ्या पत्र्यावर किटक आकर्षिले जातात. ऑईल किंवा एरंडतेल चोळणे. माशी, मावा, किटक इ. वर येऊन चिकटतात.शेण व गोमुत्र:
- 	ताजे शेण १ किलो १० लिटर पाण्यात ४ ते ५ दिवस सडवणे व ते पाणी गाळून फवारणी करणे. सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात. 
- 	गोमुत्र संजीवक व कीटकनाशक, बुरशीनाशक आहे. १ ते ५ लिटर २०० लिटर पाण्यात फवारणीसाठी.
पिकासाठी घरगुती व आयुर्वेदिक पोषकांचा वापर–
	पांढरीमुळी वाढीसाठी तांदळाची पेज 
	 २५० ग्रॅम तांदूळ, ५ लिटर पाणी उकळून प्रति झाडास १० ते २० मिली लिटर देणे. सफेद मुळीच्या जोरदार वाढीसाठी टाकणे.
	
टॉनिक फळांचा आकार वाढविणेसाठी
 २०० ग्रॅम जेष्ट  मध + २०० ग्रॅम काळे तील बारीक करून ५ लि. पाण्यात उकळावे. निम्मे अटवा थंड करून २०० लि. पाण्यात 	द्रावण  करून फवारा. 
	टोमॅटोला भेगा पडू नयेत –
 ५	लिटर दुध + २०० ग्रॅम वावडिंग पावडर १० लिटर पाण्यात फवारावे. 
फळाला चकाकी येण्यासाठी –
  सप्तधान्य अंकुर अर्क
  
	- सप्तधान्यांकुर मध्ये कोणते घटक असतात ? याबाबत असे विशिष्ट संशोधन झालेले नाही. पण फळ, दाणे वाढीच्या वेळी पेशी विभाजनासाठी आवश्यक असलेले संजिवक जिबरालिक अँसिड मोड आलेल्या धान्याच्या पांढऱ्या मुळ्यातून उपलब्ध होतात.कुठलेही बीज अंकुरीत होतांना जमीनीतुन अन्न घेत नाही जेव्हा माती व पाणी यांच्या संपर्कात येततेव्हा त्यात काही नैसर्गिक जीवनसत्वे व  संजीवके तयार होतात त्यांचा वरच ते आपला विकास करुन बाहेर येतेव पुढे सुर्यप्रकाश घेवुन अन्न तयार करुन आपला विकास करते आपण सप्त धान्य फुगवुन अंकुरीत करुन त्यात नैसर्गिक तयार झालेल संजीवके टॉनिक म्हणून उपयोग होते.
प्रमाण    
	- मुग, मटकी, गहू, उडीद, हरभरा, तीळ, चवळी प्रत्येकी १०० ग्रॅम १० लि. पाण्यात भिजवा मोड आल्यानंतर पाट्यावर वाटा १०० लि. पाण्यात द्रावण करून फवारनी करणे.
- 
फळ फुगवण होण्यासाठी :	
	
- त्रिफळा चूर्ण – दररोज संध्याकाळी गायीच्या गोवारयासोबत धुनी देणे.
- वावडिंग + तिळ + गाईचे तूप एकत्रकरून  सायंकाळी गायीच्या गोवारयासोबत धुनी द्यावी.
वाढ संवर्धक :केळीचा कंद पान येण्याआगोदार जमिनीपासून २’’ ते ३’’ उकरून मुळासकट काढावा त्याला काकडी सारखा उभा छेद देऊन बारीक काप द्या  त्याच्या वजनाइतका गुळ घेऊन आता गुळ व कंदाचे मिश्रण एकजीव होईपर्यंत ठेचा हे मिश्रण एक बरणीत भरून १० दिवस ठेवा नंतर पूर्ण घट्ट असे द्रावण तयार होईल हे २ ते ३ मिली प्रति लिटर पाण्यातून कोणत्याही पिकासाठी वापरू शकता.   
फुल धारणेसाठी
 	नारळ पाणी :-
	झाडावर कळी आल्यानंतर  – नारळाचा सफेद भाग बारीक करून त्यात ९ भाग पाणी टाकून २० दिवस झाकून ठेवणे. हे द्रावण काळे झाल्यावर ४० भाग पाणी टाकून झाडावर फवारावे. १० ग्रॅम हिंग ५० ग्रॅम दह्यात भिजवणे व हे द्रावण १० लिटर पाण्यात फवारणे. फुल संख्येच्या वृद्धीसाठी फवारावे
 	
आंबट ताक:- 
                            
	ताकात अनेक प्रकारचे एंझाइम्स व संजीवके आहेत. म्हणून फुल व फळ गळ थांबते. (बुरशीनाशक) प्रमाण २०० लिटर पाण्याला २ ते ५ लिटर. दुध देखील पोषक आहे व कोवळे दुध करपा थांबवते. प्रमाण २०० लिटर पाण्याला २ ते ५ लिटर.