उपक्रम छायाचित्र
समर्थ अॅग्रो वर्ल्ड प्रस्तावना

श्री स्वामी समर्थ महाराज जयंती महा-यात्रोत्सव ,सदगुरु प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल भूमिपूजन सोहळा व समर्थ अॅग्रो वर्ल्ड प्रदर्शन,श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर चैत्र शु.|| प्रतिपदा ,गुढीपाडवा दिनांक ११,१२,१३ एप्रिल २०१३

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ यात्रोत्सव ,सदगुरु प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल भूमिपूजन सोहळा व समर्थ अॅग्रो वर्ल्ड प्रदर्शनाचे आयोजन प.पू. गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी बांधवांना समर्थ व संपन्न बनविण्यासाठी हा कार्यक्रम दि.११ एप्रिल ते १३ एप्रिल २०१३ पर्यंत आयोजित केलेले आहे.

समर्थ अग्रो वर्ल्ड हा आध्यात्मिक, पारंपारिक, आधुनिक व सैद्रीय शेती हा चतु:सूत्री कार्यक्रम आहे. या मध्ये शेतीचे वास्तूशास्त्र आध्यात्मिक बीज संस्कार व बीज प्रक्रिया, शेतीसाठी आधुनिक तंत्र, नक्षत्रवन वनस्पती संशोधन व संवर्धन सामुहिक गट शेती, एक गाय - एक कुटुंब संकल्पना, झिरो बजेट शेती, संचार मुक्त गोठा पद्धत शेती शाळा तंत्रज्ञान इ. सर्व विषयांची सखोल माहिती प्रात्यक्षिकाद्वारे व कार्यशाळेद्वारे या प्रदर्शनात शेतक-यांना विना मूल्य करून देण्यात येणार आहे.

गुरुमाऊलींचा संदेश – शेतकऱ्यांसाठी

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील ८० % टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. म्हणून या मेळाव्याच औचित्य साधून - कृषी विभागाला पूर्ववत चांगली सुस्थिती निर्माण व्हावी. निसर्गदेवतेचा पंचमहाभूतांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा . आपणा कडून ज्ञात-अज्ञात पणाने त्यांच्या सेवेत काही उणीव राहील असेल, त्याची भर पुढील वाटचालीत आपण भरून काढावी. हे स्वामी कार्य आपणा सर्वांच आहे, सर्व शेतक-याचं आहे. गीतेमध्ये तर कृषी आणि ऋषी असा अभूतपूर्व समन्वय भगवान श्रीकृष्णांनी घडवून आणला. त्यामुळे भारत वर्षात जेवढे शेतकरी आहेत ते सगळे ऋषी आहेत असा परिचय वेळोवेळी करून देण उचित ठरणार आहे. म्हणून या कृषी राजा कडून तमाम मानवजातीची सेवा घडावी, या आम जनतेने त्यांना समजावून घ्याव असा या कार्याचा मुळ अट्टहास आहे.

वृत्तविशेष

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन-२०१३अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषिरत्न पुरस्कार