logo1

जागतिक कृषी महोत्सव २०१६

विशेष: अधिक माहिती

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की,श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक यांच्या वतीने "शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या" जागतिक स्तरावरील सेंद्रियकृषी महोत्सवाचे आयोजन दि. २२ ते २६ जानेवारी, २०१६ दरम्यान नाशिक , महाराष्ट्र (भारत) येथे करण्यात आले होते. या अंतर्गत कृषी विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कृषी महोत्सवास मिळालेला प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारचा होता.

कृषी महोत्सवास मिळालेला प्रतिसाद: पाच दिवसांच्या या जागतिक कृषी महोत्सवाला शेतकरी बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील विविध १२ राज्यातून शेतकरी येऊन गेल्याची नोंद झाली आहे. भेट देऊन गेलेल्या एकूण ४ लाख ११ हजार प्रेक्षकांपैकी शेतकऱ्यांची संख्या सुमारे १ लाख ८७ हजार इतकी प्रचंड आहे. या मध्ये शेतकरी बंधावांव्यातिरिक्त कृषी अभ्यासक, कृषी पर्यटक, कृषी संशोधक, कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योजक व व्यावसायिक, विविध क्षेत्रातील तज्ञ, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी,गृहिणी, विविध स्वयंसेवी संस्था इत्यादी विविध क्षेत्रातील लोकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी कृषी महोत्सव वेबलिंक krushimahotsav.org